खंडोबा मंदिरात स्वच्छता अभियान

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सातारा परिसरातील तीर्थक्षेत्र श्री खंडोबा मंदिरात जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्थेच्या वतीने मंदिर स्वच्छता अभियान राबवले. या स्वच्छता अभियानानंतर श्री खंडोबा रायाची विधिवत पूजा व महाआरती केली.
या मंदिराचा मुख्यध्वज बदलण्यासाठी संस्थेच्या वतीने श्री खंडोबा मंदिर ट्रस्टच्या कार्यकारिणीकडे नवीन ध्वज सुपूर्द केला. श्री खंडोबा मंदिराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासनाकडे लवकरच मंदिराच्या विकासाचा आराखडा तयार करण्याबाबत निवेदन देणार आहे. तसेच यासाठी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुहास ठोसर यांनी मंदिराच्या व्सवस्थापनाला यावेळी दिली. या तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेसोबतच मंदिराच्या विकासासाठी संस्थेने घेतलेल्या या पुढाकाराचे मंदिर ट्रस्टच्या वतीने कार्यकारिणीचे स्वागत देखील केले.
https://epaper.sanjwarta.
Powered By: Vrudhee Solutions